मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच

मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन हवेतच विरल्याचे समोर आले आहे. गृहविभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत याविषयीची आकडेवारी सादर केली. त्यात ही बाब समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Maratha Reservation Cases: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. गुन्ह्याची पर्वा न करता आंदोलन रेटण्यात आले. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य तीन वर्ष ढवळून निघाले. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हंगामाच्या तोंडावरच आंदोलनाने जोर पकडला होता. दरम्यान ताज्या अपडेटनुसार, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन हवतेच विरल्याचे समोर येत आहे. गृहविभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भातील आकडेवारी सादर केली. त्यात हा खुलासा झाला. मनोज जरांगे पाटील हे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button