40 दिवसांचा संघर्ष, 21 तास चर्चा ! इराण-अमेरिकेतील चर्चा का ठरली निष्फळ, पुढे काय होणार ?

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली, ती कोणत्याही कराराशिवाय संपली. होर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा अणुकार्यक्रम आणि अटी यांवरून दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. एकमेकांवर अनक आरपोप करण्यात आले. अमेरिकेने इराणवर अटींचे पालन न केल्याचा आरोप केला, तर इराणने “अवाजवी मागण्या” केल्याचा दोष दिला.

अमेरिका-इराणमध्ये 40 दिवस अविरत संघर्ष सुरू होता, अखेर बुधवारी युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी येत शांततेच्या प्रस्तावावर चर्चा केली. मात्र पाकची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली जगातील सर्वात महत्त्वाची राजनैतिक चर्चा अखेरीस कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. तब्बल 21 तास चाललेल्या वाटाघाटींनंतरही अमेरिका आणि इराण यांच करारावर एकमत झालं नाही. ही चर्चा केवळ एक करार नव्हती, तर गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या, मध्य-पूर्वेला हादरवून सोडणारे युद्ध कायमस्वरूपी संपवण्याचा एक प्रयत्न होता. मात्र दोन्ही देशांमधील ही चर्चा निफ्ळ ठरली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button