IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

IPL 2026, CSK vs DC: आयपीएल स्पर्धेतील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. यासह स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलग तीन पराभवातून धडा घेत चेन्नई सुपर किंग्सने सावध सुरूवात केली. तसेच 20 षटकात 2 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 189 धावा करू शकला. हा सामना चेन्नई सुपर

किंग्सने 23 धावांनी जिंकला. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. यासह चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात 2 गुण पडले आहेत.  तर दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button