बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवारही सक्रिय झाले आहेत. त्यांनी सकाळीच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली तर प्रभारी रमेश चेन्निथला यांचीशी फोनवरून चर्चा केली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. काय आहे मोठी अपडेट?

Baramati Byelection Unopposed: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता आमदार रोहित पवारही मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. तर त्यांनी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत 53 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे इतके मोठे उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघार घेणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.
